Home » राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान.

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान.

20
0

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी 27 मे , 2025 रोजी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी , केंद्रीय गृह मंत्री अमित शाह तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

पद्म पुरस्कार विषयी अधिक माहिती:

पद्म पुरस्कार हे भारत सरकार कडून देण्यात येणारे सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. दरवर्षी मार्च वा एप्रिल महिन्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात . एक पदक आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) असे या पुरस्कारांचे स्वरूप असते.

पद्म पुरस्कारांचे वर्ग:

पद्म पुरस्कार तीन वर्गात प्रदान करण्यात येतात.

  1. पद्मविभूषण पुरस्कार : असामान्य आणि विशेष कार्यासाठी
  2. पद्मभूषण पुरस्कार: उच्च स्तरीय विशेष कार्यासाठी
  3. पद्मश्री पुरस्कार : विशेष कार्यासाठी

पद्म पुरस्कारांचा इतिहास :

भारत सरकारने 1954 मध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कार निर्माण केले. ह्यांपैकी पद्म पुरस्कार हा पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग असे विभागून देण्यात येत . 8 जानेवारी, 1955 च्या राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे ह्या वर्गांना अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्याात आली.

निवड कशी होते ?

पद्म पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांकडून प्रत्येक वर्षी एक समिती नियुक्त करण्यात येते. या समितीला पद्म पुरस्कार समिती असे म्हणतात. मंत्रिमंडळ सचिव हे या समितीचे प्रमुख असतात. गृहसचिव , राष्ट्रपतींचे सचिव आणि चार ते सहा ख्यातनाम व्यक्ती समितीत सदस्य म्हणून समाविष्ट असतात. ही समिती आलेल्या नामांकनांमधून पुरस्कारासाठी नावे निश्चित करते. ही नावे समितीद्वारे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येतात.

पद्म पुरस्कार 2025

पद्मविभूषण पुरस्कार – (7)

  1. श्री . धुव्वूर नागेश्वर रेड्डी – वैद्यकीय
  2. न्यायमूर्ती (निवृत्त) श्री. जगदीश सिंह खेहर – सार्वजनिक व्यवहार
  3. श्रीमती कुमुदिनी रजनिकांत लाखिया – कला
  4. श्री.लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम – कला
  5. श्री. एम. टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर) – साहित्य आणि शिक्षण
  6. श्री. ओसामू सुझुकी (मरणोत्तर) – व्यापार आणि उद्योग
  7. श्रीमती शारदा सिन्हा (मरणोत्तर) – कला

पद्मभूषण पुरस्कार – (19)

  1. श्री. सूर्य प्रकाश – साहित्य, शिक्षण , पत्रकारिता
  2. श्री. अनंत नाग – कला
  3. श्री. विवेक देबराॅय (मरणोत्तर) – साहित्य आणि शिक्षण
  4. श्री. जतीन गोस्वामी – कला
  5. श्री. जोश चाको पेरियापूरम – वैद्यकीय
  6. श्री. कैलाश नाथ दीक्षित – पुरातत्व
  7. श्री. मनोहर जोशी (मरणोत्तर) – सार्वजनिक व्यवहार
  8. श्री. नाल्ली छेट्टी – उद्योग , व्यापार
  9. श्री. नंदमुराई बालकृष्णा – कला
  10. श्री. पी. आर. श्रीजेश – खेळ
  11. श्री. पंकज पटेल – उद्योग, व्यापार
  12. श्री. पंकज उदास (मरणोत्तर) – कला
  13. श्री. रामबहादुर राय – साहित्य, शिक्षण , पत्रकारिता
  14. साध्वी ॠतंभरा – समाजकार्य
  15. श्री. एस . अजित कुमार – कला
  16. श्री. शेखर कपूर – कला
  17. मिस शोबाना चंद्र कुमार – कला
  18. श्री. सुशीलकुमार मोदी (मरणोत्तर) – सार्वजनिक व्यवहार
  19. श्री. विनोद धाम – विज्ञान आणि अभियांत्रिकी

पद्मश्री पुरस्कार- (113)

  1. श्री. अद्वैत चरण गडनायक – कला
  2. श्री. अच्युत रामचंद्र पालव – कला
  3. श्री. अजय भट्ट – विढज्ञान आणि अभियांत्रिकी
  4. श्री. अनिल बोरो – साहित्य आणि शिक्षण
  5. श्री. अर्जित सिंह – कला
  6. श्रीमती अरूंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
  7. श्री. अरुणोदय साहा – साहित्य आणि शिक्षण
  8. श्री. अरविंद शर्मा – साहित्य आणि शिक्षण
  9. श्री. अशोक महापात्रा – वैद्यकीय
  10. श्री. अशोक सराफ – कला
  11. श्री. आशुतोष शर्मा – विज्ञान आणि अभियांत्रिकी
  12. श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे – कला
  13. श्री. बैजनाथ महाराज – अन्य
  14. श्री. बॅरी गाॅडफे जाॅन – कला
  15. श्रीमती बेगम बाटोल – कला
  16. श्री. भारत गुप्त – कला
  17. श्री. भेरू सिंह चौहान – कला
  18. श्री. भीम सिंह भावेश – समाजकार्य
  19. श्रीमती भिमाव्वा शिल्लेकयाथारा – कला
  20. श्री. बुधेंद्रा कुमार जैन – वैद्यकीय
  21. श्री. सी. एस. वैद्यनाथ – सार्वजनिक व्यवहार
  22. श्री. चैतराम रामचंद पवार – समाजकार्य
  23. श्री. चंद्रकांत शेठ (मरणोत्तर) – साहित्य आणि शिक्षण
  24. श्री. चंद्रकांत सोमपुरा ‌- अन्य
  25. श्री. चेतन चिटणीस – विज्ञान आणि अभियांत्रिकी
  26. श्री. डेव्हिड सैयामलीह – साहित्य आणि शिक्षण
  27. श्री. दुर्गा चरण रणबीर – कला
  28. श्री. फारूख अहमद मीर – कला
  29. श्री. गणेश्वर शास्त्री डेव्हिड – साहित्य आणि शिक्षण
  30. श्रीमती गीता उपाध्याय – साहित्य आणि शिक्षण
  31. श्री. गोकुळ चंद्र दास – कला
  32. श्री. गुरूयावूर देवराय – कला
  33. श्री. हरचंदन सिंह भट्ट – कला
  34. श्री. हिरामन शर्मा – शेती
  35. श्री. हरजिंदर सिंह श्रीनगरवाले – कला
  36. श्री. हरविंदर सिंह – खेळ
  37. श्री. हसन राहू – कला
  38. श्री. हेमंत कुमार – वैद्यकीय
  39. श्री. ह्रदय नारायण दीक्षित – साहित्य आणि शिक्षण
  40. श्री. ह्यूग अँड कोलने गँटझेर (मरणोत्तर, दोघांनाही) – साहित्य, पत्रकारिता, शिक्षण
  41. श्री. इनीवालाप्पील मिनी विजयन – खेळ
  42. श्री. जगदीश जोशिला – साहित्य आणि शिक्षण
  43. श्रीमती जसपिंदर नारूला – कला
  44. श्री. जोनस मासेट्टी – अध्यात्म
  45. श्री. जयोनाचंद्रम बथारी – कला
  46. श्रीमती जुमदे योमगम गॅमलीन – समाजकार्य
  47. श्री. के. दामोदरन – अन्य
  48. श्री. के. एल. कृष्णा – साहित्य आणि शिक्षण
  49. श्रीमती के. ओमानाकुट्टी अम्मा – कला
  50. श्री. किशोर कुणाल – प्रशासकीय सेवा
  51. श्री. एल. हँगथिंग – शेती
  52. श्री. लक्ष्मीपथे रामासु्ब्बेयेर – साहित्य, पत्रकारिता, शिक्षण
  53. श्री. ललित कुमार मांगोत्रा – साहित्य आणि शिक्षण
  54. श्री. लांबा लोबझांग ( मरणोत्तर) – अध्यात्म
  55. श्रीमती लिंबिया लाबो सरदेसाई – समाजकार्य
  56. श्री. एम. डी. श्रीनिवास – विज्ञान आणि अभियांत्रिकी
  57. श्री. मदुगुला नागपाणी शर्मा – कला
  58. श्री. महावीर नायक – कला
  59. श्रीमती ममता शंकर – कला
  60. श्री. मंदा कृष्णा मडिगा – सार्वजनिक व्यवहार
  61. श्री. मूर्ती भूजंगराव चितमपल्ली – साहित्य आणि शिक्षण
  62. श्री. मिर्रियाला अप्पाराव (मरणोत्तर) – कला
  63. श्री. नागेंद्र नाथ राॅय – साहित्य आणि शिक्षण
  64. नारायण ( भूलाई भाई ) (मरणोत्तर) – सार्वजनिक व्यवहार
  65. नरेन गुरूंग – कला
  66. श्रीमती नीरजा भाटला – वैद्यकीय
  67. श्रीमती निर्मला देवी – कला
  68. श्री. नितीन नोहरिया – साहित्य आणि शिक्षण
  69. श्री. विनायक लोहाणी – सामाजिक कार्य
  70. श्री. विलास डोंगरे – आरोग्य क्षेत्र
  71. श्रीमती विजयलक्ष्मी देशमाने – आरोग्य क्षेत्र
  72. श्री. विजय महाराज – अध्यात्मिक क्षेत्र
  73. श्री. वेनकप्पा सुगतेकर – कला
  74. श्री. वेनु असान – कला
  75. श्री. वासुदेव कामथ – कला
  76. श्री. वदिराज पंचमुखी – साहित्य आणि शिक्षण
  77. श्री. तुषार शुक्ला – साहित्य आणि शिक्षण
  78. श्रीमती थियम देवी – कला
  79. श्री. तजेंद्र मुजुमदार – कला
  80. श्री. सईद हसन – साहित्य आणि शिक्षण
  81. श्री. स्वामी कार्तििक महाराज – अध्यात्म
  82. श्री. सुरेंद्र कुनार बंसल – विज्ञान आणि अभियांत्रिकी
  83. श्रीमती सोनिया नित्यानंद – आरोग्य
  84. श्री. श्याम अग्रवाल – कला
  85. श्री. सुरेश सोनी – सामाजिक कार्य
  86. श्री. सुभाष शर्मा – कृषी
  87. श्री. स्टीफन कानप – साहित्य आणि शिक्षण
  88. श्री. शाईन निझाम – साहित्य आणि शिक्षण
  89. श्रीमती शेख अली अल जाबेर – साहित्य आणि शिक्षण
  90. श्री. सेथुरमन पंचनाथम – विज्ञान
  91. श्री. सीनी विश्वनाथन – विज्ञान
  92. श्री. सत्यपाल सिंग – खेळ
  93. श्री. संत राम देसवल – साहित्य आणि शिक्षण
  94. श्रीमती सॅली होळकर – उद्योग
  95. श्री. सज्जन भजंका – उद्योग
  96. श्री. रिकी केज – कला
  97. श्री. रेबा महांता – कला
  98. श्री. रतन परिमाऊ – कला
  99. श्री. राजेंद्र मुजुमदार – कला
  100. श्री. रामदर्श मिश्रा – साहित्य आणि शिक्षण
  101. श्री. राधाकृष्णन – कला
  102. श्रीमती राधा भट – सामाजिक कार्य
  103. श्री. चंद्रमोहन – उद्योग
  104. श्री. आर. अश्विन – खेळ
  105. श्रीमती प्रतिभा सत्यर्थी – साहित्य आणि शिक्षण
  106. श्री. प्रशांत प्रकाश – उद्योग
  107. श्री. परमार नागजीभाई – कला
  108. श्री. राम महादेवी – कला
  109. श्री. दत्ताचनमूर्ती – कला
  110. श्रीओंकार पाहावा – उद्योग
  111. श्री. पवन गोएंका – उद्योग
Form submission is now closed.

.

1 thought on “राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights