Home » महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘ महिला समृद्धी योजना ‘

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘ महिला समृद्धी योजना ‘

63
0

भारतामध्ये महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे केंद्र व राज्य सरकारांच्या धोरणांचा महत्वाचा भाग आहे. या दृष्टीने केंद्र सरकारने व महाराष्ट्र राज्य शासनाने ” महिला समृद्धी योजना ” ( Mahila Samruddhi Yojana) या महत्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वयंरोजगार, उद्योगधंदा आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत पुरवली जाते. महाराष्ट्र राज्यात ही योजना फक्त चर्मकार वर्गातील महिलांसाठी लागू

योजनेची उद्दिष्टे :

  1. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे.
  2. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवली मदत.
  3. स्वरोजगार, प्रशिक्षण आणि आर्थिक साक्षरता यासाठी पाठबळ देणे.

योजनेची वैशिष्ट्ये:

  1. व्यवसाय सुरू करण्यासाठी रूपये 50,000 पर्यंतचे कर्ज उपलब्ध होते.
  2. कर्जावर 4% इतक्या नाममात्र व्याजदराने कर्ज दिले जाते.
  3. शिक्षण , शिवणकाम, किराणा दुकान, डेअरी व्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कर्जाचा उपयोग करता येतो.
  4. महाराष्ट्रात हि योजना फक्त चर्मकार वर्गातील महिलांसाठी उपलब्ध आहे.

पात्रता :

  1. अर्जदार महिला हि भारताची नागरिक असावी.
  2. अर्जदार महिला हि महाराष्ट्राची रहिवाशी असावी आणि चर्मकार वर्गातील असावी . ( महाराष्ट्र राज्यासाठी )
  3. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे शासनाच्या निर्धरित मर्यादेत असावे. ( सध्या 1.20 लाखांपर्यंत)
  4. पुर्वी कोणतेही व्यावसायिक कर्ज घेतलेले नसावे.
  5. घेतलेले कर्ज फेडण्याची मुदत 3 वर्षे असते.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रहिवाशी दाखला
  3. व्यवसायाचा पुरावा
  4. उत्पन्न प्रमाणपत्र
  5. पासपोर्ट साईज फोटो

अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी LIDCOM ( Leather Industries Development Corporation of Maharashtra) च्या जिल्हा कार्यालयाला भेट द्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी NSFDC ( National Scheduled Castes Finance and Development Corporation ) च्या वेबसाईटला भेट द्या.

योजनेचे फायदे

  1. ग्रामीण व शहरी महिलांना आर्थिक स्वतंत्रता मिळते.
  2. महिलांचा सामाजिक स्तर ऊंचावतो.
  3. लघुउद्योग, सेवा व्यवसायांमध्ये महिलांचा सहभाग वाढतो.
  4. रोजगार निर्मती व महिला सशक्तीकरण होते.

काही महत्वाचे प्रश्न

प्रश्न 1 : ही योजना कोणत्या वयोगटातील महिलांसाठी आहे?

उत्तर : 18 ते 55 वयोगटातील महिलांसाठी योजना लागू आहे.

प्रश्न 2 : ही योजना केवळ ग्रामीण भागासाठी आहे का ?

उत्तर : नाही. योजना ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी लागू आहे.

प्रश्न 3 : व्याजदर किती आहे?

उत्तर : केवळ 4% व्याजदर आहे.

प्रश्न 4 : योजना कशासाठी वापरता येते ?

उत्तर : व्यवसाय, शिलाई, किराणा दुकान, डोंगरी उत्पादने, अन्नप्रक्रिया , इत्यादी.

निष्कर्ष

‘ महिला समृद्धी योजना ‘ ही केवळ आर्थिक मदत नसून, महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडून उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे. या योजनेंतर्गत महिलांना आर्थिक, मानसिक, सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम करण्याचा उद्देश आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करून स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करावी, हेच या योजनेचे खरे यश ठरेल.

image source : From Google

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
×
Verified by MonsterInsights