महाराष्ट्राचे सुपुत्र भुषण गवई हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश बनले आहेत. काल 14 मे रोजी भुषण गवई यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली व पदभार देखील स्वीकारला . भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती भुषण गवई यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या जागी न्यायमूर्ती भुषण गवई यांची सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार आहे.
भुषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर, 1960 रोजी महाराष्ट्र राज्यात अमरावती येथे झाला. 16 मार्च, 1985 रोजी त्यांनी वकीली सुरु केली . त्यांनी 1987 ते 1990 पर्यंत मुंबई हायकोर्टात स्वतंत्रपणे वकिली केली. 1990 नंतर , त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठासमोर वकिली केली. त्यांनी संवैधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्याचा ही सराव केला.

न्यायमूर्ती भुषण गवई हे नागपुर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते. त्यांनी SICOM, DCVL इत्यादी विविध स्वायत्त संस्था आणि महामंडळे आणि विदर्भातील विविध नगरपरिषदांसाठी नियमितपणे काम पाहिले. ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 पर्यंत त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली . नंतर, 17 जानेवारी, 2000 रोजी त्यांची नागपुर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली . 14 नोव्हेंबर, 2003 रोजी त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. 12 नोव्हेंबर, 2005 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमचे न्यायाधीश झाले . 14 वर्षे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर , 24 मे , 2019 रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, हे पद त्यांनी 13 मे , 2025 पर्यंत भुषवले. आता ते भारताचे सरन्यायाधीश आहेत.
न्यायालयाने घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये, खंडपीठांमध्ये भुषण गवई हे देखील होते.
कलम 370 रद्द करणे, इलेक्ट्रोरल बाॅन्ड रद्द करणे, नोटबंदीला कायद्याच्या दृष्टीने घटनात्मक सिद्ध करणे या निर्णयांच्या खंडपीठांमध्ये भुषण गवई हे सदस्य होते.
Important information.
Very useful information.
Very knowledgeable information .
Very nice information.
Very useful information.