Home » डिजिटल शेती – भारतीय शेतकऱ्यांसाठी एक क्रांती

डिजिटल शेती – भारतीय शेतकऱ्यांसाठी एक क्रांती

74
0

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील जवळपास 55% लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. परंतु , पारंपारिक शेतीत अनेक अडचणी , अस्थिरता आणि नफा कमी असतो. या पार्श्वभूमीवर , तंत्रज्ञानाने शेतीच्या क्षेत्रात नवीन क्रांती घडवली आहे – हीच डिजिटल शेती. ही केवळ एक तांत्रिक संकल्पना नसून, भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा एक मोठा टप्पा आहे.

डिजिटल शेती म्हणजे काय?

डिजिटल शेती म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट, मोबाईल Apps , सॅटेलाईट डेटा, सेन्सर्स ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI ) आणि बिग डेटा Analytics चा शेतीत वापर करणे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो :

  1. जमिनीचे नकाशे तयार करणे.
  2. हवामानाची अचूक माहिती .
  3. पीक सल्ला व कीड व्यवस्थापन
  4. पाणी व्यवस्थापन आणि स्मार्ट सिंचन.
  5. डिजिटल बाजारपेठाआणि थेट विक्री.
  6. कर्ज, विमा आणि सरकारी योजना यांची माहिती.

डिजिटल शेतीचे फायदे

1. उत्पादनात वाढ:

डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने योग्य खत , बियाण आणि सिंचन याचा वापर करून उत्पादनात मोठी वाढ करणे शक्य आहे.

2. अचूक हवामान माहिती :

मोबाईल Apps द्वारे हवामानाची माहिती मिळाल्याने शेतकरी योग्य वेळी पेरणी , औषध फवारणी करू शकतात.

3. खर्चात बचत :

स्मार्ट सिंचन, ड्रिप इरिगेशन किंवा ड्रोन फवारणी मुळे किटकनाशकांचा अपव्यय कमी होतो व खर्चात बचत

4. थेट ग्राहकांशी संपर्क:

डिजिटल मार्केटप्लेस जसे की eNAM , AgriBazaar , Farmers Producer Organizations ( FPOS) यांच्या माध्यमातून शेतकरी थेट ग्राहकांना विक्री करू शकतात.

5. माहितीची सहज उपलब्धता:

माती परीक्षण, योग्य बियाण , पीक सल्ला यासाठी वेगवेगळे Apps जसे की Kisan Suvidha , IFFCO Kisan , mKisan , Agri App उपलब्ध आहेत.

डिजिटल शेतीतील प्रमुख तंत्रज्ञान:

1. ड्रोन तंत्रज्ञान :

ड्रोनचा वापर जमिनीचे नकाशे बनविणे , किटकनाशक फवारणी, पीक स्थिती निरीक्षण यासाठी करता

2. AI व IOT सेन्सर्स:

शेतातील तापमान, आर्द्रता , मातीची नमी यांचे सेन्सरद्वारे निरीक्षण करून डेटा AI च्या साहाय्याने विश्लेषित करता येतो.

3. सॅटेलाईट इमेजिंग :

शेतजमिनीच्या नकाशावरून जमिनीचा प्रकार, जमिनीची सुपिकता, पिकांची वाढ याचे परीक्षण करता येते.

भारतात डिजिटल शेतीचे प्रयत्न

1. डिजिटल इंडिया मोहिम:

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत अनेक कृषी आधारित Apps , पोर्टल्स व सॉफ्टवेअर्स विकसित करण्यात आले आहेत.

2. ई-नाम (eNAM) :

राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून शेतकरी थेट बाजारात आपले उत्पादन विकू शकतात.

3. PM- KISAN योजना :

या योजनेतून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक रक्कम मदत म्हणून जमा केली

4. स्टार्टअप्स आणि अ‍ॅग्रीटेक कंपन्या :

DeHaat, AgroStar, Ninjacart, Stellapps यांसारख्या कंपन्या डिजिटल शेतीला चालना देत आहेत.

अडचणी आणि उपाय

अडचणी :

  1. ग्रामीण भागात इंटरनेटची कमी उपलब्धता.
  2. डिजिटल साक्षरतेचा अभाव.
  3. स्थानिक भाषेतील माहितीची कमतरता.
  4. तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शनाचा अभाव.

उपाय :

  1. डिजिटल प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन.
  2. कृषी विभागातून स्थानिक भाषेतील Apps व माहिती उपलब्ध करून देणे.
  3. शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सक्रिय सहभाग.
  4. ग्रामीण भागात 5G व ब्रॉडबँड इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे.

निष्कर्ष

डिजिटल शेती हि केवळ एक तांत्रिक संकल्पना नाहीये. हि शेतकऱ्यांसाठी उत्तम संधी आहे आर्थिकदृष्ट्या स्वतःला सबळ, सक्षम आणि सशक्त बनवण्याची. जर शासन , तंत्रज्ञ, शेतकरी , उद्योग क्षेत्र यांनी एकत्र यावर काम केल्यास आपला भारत देश शेतीत देखील नक्कीच प्रगती करेल. बघा पटतय का तुम्हाला ?

डिजिटल इंडिया

लेख आणि विचार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
×
Verified by MonsterInsights