
भारत हा देश प्राचीन काळापासूनच संपन्न, समृद्ध व ज्ञानपरंपरेत आघाडीवर राहिलेला आहे. मात्र आधुनिक युगात जागतिक स्पर्धा, आयात-निर्यात यांचे बदलते समीकरण, परदेशी उत्पादनांवरील अवलंबित्व या सर्वांचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेली ” आत्मनिर्भर भारत ” ही संकल्पना केवळ आर्थिक धोरण नसून भारताच्या सर्वांगीण विकासाचा महामार्ग ठरते.
Table of contents
आत्मनिर्भर भारत म्हणजे काय
आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताने सर्व क्षेत्रांत – शेती , उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान , आरोग्य, संरक्षण – या सर्वच क्षेत्रांत स्वावलंबी होणे. बाहेरच्या देशांवर अवलंबून न राहता , आपल्या संसाधनांचा उपयोग करून, आपल्या कौशल्यांचा विकास करून, आपलेच उत्पादन प्राधान्याने वापरणे , आणि त्यातून जगात आपली ताकद निर्माण करणे हा त्यामागचा हेतू आहे.
आत्मनिर्भर भारताचे पाच स्तंभ
सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानासाठी पाच प्रमुख स्तंभ अधोरेखित केले आहेत.
- अर्थव्यवस्था (Economy) : दीर्घकालीन व सर्वसमावेशक वाढ
- आधारभूत सुविधा (Infrastructure) : आधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधा .
- प्रणाली (System) : तंत्रज्ञान-आधारित व पारदर्शक व्यवस्था.
- लोकसंख्या (Demography) : भारताची तरूण व सक्षम लोकसंख्या हिच ताकद.
- मागणी (Demand) : स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन व बाजारपेठ वाढवणे.
आत्मनिर्भर भारताचे फायदे
- आर्थिक मजबुती : स्थानिक उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मिती वाढेल.
- विदेशी अवलंबित्व कमी होईल : औषधे , तंत्रज्ञान, संरक्षणसामग्री यासाठी परदेशावर अवलंबित्व कमी होईल.
- ग्रामीण विकास : लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय, स्टार्टअप्स यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्माण होईल.
- नवोपक्रमास प्रोत्साहन : नवीन तंत्रत्रान, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया या माध्यमातून नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणल्या जातील.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान बळकट होईल.
आत्मनिर्भर भारतात सामान्य नागरिकाची भूमिका
- स्थानिक उत्पादनांचा वापर करणे. ( Vocal for Local)
- लघुउद्योग व स्वदेशी ब्रँड्सला प्राधान्य देणे.
- रोजगारनिर्मिती साठी कौशल्य विकास प्रशिक्षण घेणे.
- शेती, तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण , पर्यावरणपूरक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणे.
आत्मनिर्भर भारत अभियानाची आव्हाने
- जागतिक स्पर्धेमुळे स्वदेशी उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवणे आवश्यक.
- संशोधन व विकासावर पुरेशी गुंतवणूक करण्याची गरज .
- ग्रामीण व शहरी भागातील विकासातील दरी कमी करणे .
- प्रशासनातील भ्रष्टाचार कमी करणे व पारदर्शकता वाढवणे.
निष्कर्ष
आत्मनिर्भर भारत हे केवळ घोषवाक्य नाही, तर प्रत्येक भारतीयाने स्वीकारलेली जीवनशैली ठरली पाहिजे. स्वदेशी वस्तूंचा वापर, स्थानिक उद्योगांना पाठबळ, कौशल्यविकास, नवोपक्रम व जबाबदारीची जाणीव या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने ” आत्मनिर्भर भारत ” घडवू शकतो. भारताची ताकद ही त्याच्या तरुणाईत , संसाधनांत आणि संस्कृतीत आहे. ह्याच शक्तींचा उपयोग करून आपला भारत देश जगाच्या रंगमंचावर सक्षम व स्वावलंबी राष्ट्र म्हणून ऊभा राहील , यात शंकाच नाही.
Image – Taken from Google .
Very useful information.
Very knowledgeable information .
Very nice information.
Important information.