Home » आता 7 तासांचा प्रवास होणार 2 तासांत पूर्ण.

आता 7 तासांचा प्रवास होणार 2 तासांत पूर्ण.

10
0

केंद्रीय महामार्ग, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात अजुन एक महामार्ग तयार होणार आहे. त्यामुळे 7 तासांचा प्रवास 2 तासांत पूर्ण करता येणार आहे. हा महामार्ग पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाला जोडणार आहे. केंद्रीय महामार्ग, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हि माहिती दिली आहे.

केंद्रीय महामार्ग, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान 15 हजार कोटी रूपये खर्चून एक नवीन महामार्ग तयार होणार असल्याची घोषणा केली आहे . ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी यासंदर्भत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देतांना नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान नवा महामार्ग विकसित होईल आणि यामुळे 7 तासांचा प्रवास फक्त 2 तासांत पूर्ण होईल अशी माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील महामार्गावर होणारी वाहतूककोंडी टाळण्यसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याचे सभागृहात सांगितले. आगामी 2 वर्षात दोन पदरी रस्ते चार पदरी तर चार पदरी रस्ते सहा पदरी करण्यात येणार आहेत. देशातील जवळपास 25 हजार किलोमीटरचे दोन पदरी रस्ते चार पदरी करण्यात येणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांची संख्या किती वाढली ? याचा एक डेटा सादर करत नितीन गडकरी यांनी अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सरकारची भूमिका काय? याबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे? यासंदर्भाातही सभागृहाला मोठी माहिती दिली आहे. यावेळी नितीन गडकरी म्हणालेत की वाहनाचा जास्त वेग, गाडी चालवतांना मोबाईलचा वापर, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, रस्त्यांची खराब स्थिती यामुळे अपघात होतात. म्हणून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग मंत्रालय उपाययोजना राबवत आहे.

Form submission is now closed.

महाराष्ट्र

1 thought on “आता 7 तासांचा प्रवास होणार 2 तासांत पूर्ण.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights