Home » केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

0
0

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिल पासून Unified Pension Scheme लागू करण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळणार आहे.

केंद्र सरकार 1 एप्रिल पासून Unified Pension Scheme लागू करणार आहे. या नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठराविक रक्कम मिळणार आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अंतर्गत Unified Pension Scheme ची घोषणा केली होती. ही स्कीम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. जे कर्मचारी आधीच नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये रजिस्टर आहेत, त्यांनाच या योजनेचा फायदा होणार आहे.

काय आहे UPS Scheme ?

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Unified Pension Scheme ( UPS ) जाहीर केली, ज्याचा उद्देश निवृत्ती नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना स्थिरता, प्रतिष्ठा आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, त्यांचे कल्याण आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे आहे.

सध्या, सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ( NPS ) अंतर्गत समाविष्ट केले जाते. हे कर्मचारी NPS चालू ठेवू शकतात किंवा UPS योजनेत बदलू शकतात. तसेच , एकदा कर्मचाऱ्यांनी UPS निवडल्यानंतर , निर्णय अंतिम असतो ,त्यात बदल करता येत नाही.

राज्य सरकारे देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी UPS योजना स्वीकारू शकतात आणि अंमलात आणू शकतात. महाराष्ट्र हे UPS लागू करणारे पहिले राज्य आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 25 ऑगस्ट , 2024 रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हि योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. जर सर्व राज्यांनी UPS योजना स्वीकारली तर त्याचा फायदा संपूर्ण भारतातील NPS योजने अंतर्गत येणाऱ्या 90 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना होईल.

युनिफाइड पेन्शन योजनेचे तपशील :

योजनेचे नाव: युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS )
रोजी जाहीर केले24 ऑगस्ट, 2024
रोजी सूचित केले 24 जानेवारी, 2025
अंमलबजावणीची तारीख1 एप्रिल, 2025
लाभार्थीकेंद्र सरकारी कर्मचारी
कर्मचाऱ्यांचे योगदान मूळ पगाराच्या 10% + महागाई भत्ता

सरकारचे योगदान: मूळ पगाराच्या 18.5% + महागाई भत्ता

फायदे :

  1. किमान 25 वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती पूर्वीच्या गेल्या 12 महिन्यांत सरासरी मूळ पगाराच्या 50% पेन्शन.
  2. किमान 10 वर्षाच्या सेवेच्या निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रूपये.

कसे ठरतील केंद्रीय कर्मचारी UPS साठी पात्र?

  1. NPS अंतर्गत समाविष्ट असावा आणि 1 एप्रिल , 2025 रोजी सेवेत असणारा विद्यमान केंद्र सरकारचा कर्मचारी.
  2. 1 एप्रिल, 2025 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होणारे नवीन कर्मचारी.
  3. केंद्र सरकारचा असा कर्मचारी, जो NPS अंतर्गत 31 मार्च, 2025 रोजी किंवा त्यापूर्वी मूलभूत नियम 56(जे) अंतर्गत स्वेच्छेने निवृत्त झाला आहे.
  4. NPS अंतर्गत येणारा केंद्र सरकारचा निवृत्त कर्मचारी ज्याचा UPS चा पर्याय निवडण्या पूर्वीच मृत्यू झाला आहे, त्या कर्मचाऱ्याचा कायदेशीररित्या विवाहित जोडीदार .

अशा प्रकारे आहे केंद्र सरकारची Unified Pension Scheme योजना.

राज्य सरकारी कर्मचारी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
×
Verified by MonsterInsights