Home » हे अत्यंत महत्वाचे कार्ड प्रत्येक नागरिकाकडे असायलाच हवेत.

हे अत्यंत महत्वाचे कार्ड प्रत्येक नागरिकाकडे असायलाच हवेत.

72
0

वाचकहो आजच्या डिजिटल युगात एक नागरिक म्हणून आपली ओळख आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. ही कार्डे केवळ ओळखपत्र नसून, आर्थिक व्यवहार , आरोग्य, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका बजावतात. चला तर मग पाहुयात अशी कोणती महत्त्वाची कार्डे आहेत जी प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

1. आधार कार्ड ( Aadhaar Card)

आधार कार्ड हे भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI ) द्वारे जारी केलेले आहे. आधार कार्ड हे बायोमेट्रिक आणि वैयक्तिक माहिती समाविष्ट असलेले आणि भारतात सर्वत्र वापरले जाणारे असे ओळखपत्र आहे.

उपयोग :

  1. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी . ( जसे की : उज्वला योजना, पीएम किसान योजना , इत्यादी.)
  2. बँक खाते उघडण्यासाठी.
  3. मोबाईल सिम घेण्यासाठी .
  4. पॅन कार्डशी लिंक करून आर्थिक व्यवहारात पारदर्शकता.

आधार कार्ड तुम्ही My AADHAAR APP आणि Aadhar Early Access या Apps वर बनवू शकता.

https://myaadhaar.uidai.gov.in

2. पॅन कार्ड ( PAN Card )

आयकर विभागाने जारी केलेले हे कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत आवश्यक असे कार्ड आहे.

उपयोग :

  1. आयकर रिटर्न भरणे.
  2. बँकेतील मोठे व्यवहार.
  3. संपत्तीची खरेदी-विक्री

https://www.incometax.gov.in

या वेबसाईट वर तुम्ही तुमचे पॅन कार्ड बनवू शकता.

3. रेशन कार्ड (Ration Card )

अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य मिळवून देण्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त आहे.

उपयोग :

  1. रेशन दुकानांमधून धान्य वाटप.
  2. विविध सरकारी योजनांचा लाभ देखील रेशन कार्ड चा वापर करून मिळवता येतो.
  3. नागरिकत्वाचा पुरावा म्हणून
  4. आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी देखील रेशन कार्ड बनवलेले असणे आवश्यक आहे.

https://nfsa.gov.in

या वेबसाईट वर तुम्ही रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता.

4. मतदान कार्ड (Voter ID / EPIC Card)

मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून त्यासाठी मतदान कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. हे कार्ड निवडणुक आयोगाकडून जारी केलेले आहे.

उपयोग :

  1. निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी.
  2. विविध सरकारी योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून.

https://eci.gov.in

या वेबसाईट वर तुम्ही मतदान कार्ड साठी अर्ज करू शकता .

5. आयुष्मान कार्ड (Aayushman Card )

गरीब व गरजू लोकांना मोफत आरोग्यसेवा देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना .

उपयोग :

  1. 5 लाखांपर्यंत मोफत उपचार.
  2. खासगी/शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा .
  3. हॉस्पिटल बिलांपासून सुटका.

https://beneficiary.nha.gov.in

या वेबसाईट वर तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड बनवू शकता .

6. अपार आयडी कार्ड (APAAR ID Card )

हे कार्ड विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. या कार्ड मध्ये विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी साठवली जाते . हे कार्ड केंद्र शासनाकडून हे कार्ड जारी केले गेलेले आहे. या कार्ड साठी विद्यार्थी स्वतः ही नोंदणी करू शकता किंवा शाळा आणि महाविद्यालयांकडे देखील मागणी करू शकता.

उपयोग:

  1. शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी .
  2. शिष्यवृत्ती अर्जासाठी.
  3. ऑनलाईन शिक्षण पोर्टल्सवरील प्रवेशासाठी.

https://abc.gov.in

http://apaar.Education.gov.in

या वेबसाईट वर विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालय अपार कार्ड साठी नोंदणी करू शकतात.

आभा कार्ड (AABHA Card )

आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा कार्ड. हे कार्ड केंद्र शासनाकडून जारी केले गेलेले आहे. या कार्ड मध्ये तुम्ही तुमची सर्व आरोग्यविषयक माहिती डिजीटल स्वरूपात साठवू शकता. हे कार्ड कोणत्याही रुग्णालयांमध्ये उपचारासाठी उपयुक्त ठरते. या कार्ड मुळे डॉक्टरांना रुग्णांची आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध होते त्यामुळे उपचार करणे सहज , सुलभ व तत्काळ उपचार करणे शक्य होते.

उपयोग :

  1. खासगी/शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार.
  2. सर्व आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाते.
  3. आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध होते आणि शेअर करता येते.
  4. उपचार सहज, सुलभ व जलद शक्य होतो.

https://abha.abdm.gov.in

या वेबसाईट वर तुम्ही तुमचे आभा कार्ड बनवू शकता.

8. फार्मर आयडी (Farmer ID)

हे कार्ड शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. या कार्ड मध्ये शेतकरी शेतीशी संबंधित सर्व माहिती नोंदवू शकतात. हे कार्ड केंद्र शासनाकडून जारी केले गेलेले आहे.

उपयोग :

  1. शेती संबंधित सर्व माहिती डिजिटल स्वरूपात नोंद.
  2. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी .
  3. शेतकऱ्यांचे ओळखपत्र म्हणून.

https://mhfr.agristack.gov.in

या वेबसाईट वर शेतकरी फार्मर आयडी साठी अर्ज करू शकतात .

स्वावलंबन कार्ड/युडीआयडी कार्ड (Swalamban Card / UDID Card )

युडीआयडी म्हणजेच युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड. यालाच स्वावलंबन कार्ड असेही म्हणतात. हे कार्ड दिव्यांग व्यक्तीं साठी अत्यंत उपयुक्त. हे कार्ड केंद्र शासनाकडून जारी केले गेलेले आहे.

उपयोग :

  1. दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र म्हणून.
  2. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी.
  3. रूग्णलयात उपचार व तपासणीसाठी.

https://wwwswavlambancard.gov.in

या वेबसाईट वर तुम्ही तुमच्या स्वावलंबन कार्ड साठी नोंदणी करू शकतात.

निष्कर्ष

आजच्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकाकडे वर नमूद केलेले सर्व कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. ही कार्डे केवळ सरकारी सेवा मिळवण्यासाठीच नाहीत, तर दैनंदिन जीवनात सुलभता व सहजता निर्माण करतात.

तुमच्याकडे हे सर्व कार्ड आहेत का ? जर नाहीत, तर आजच कार्ड साठी अर्ज करा आणि आपल्या हक्कांचा व सुविधांचा लाभ घ्या. वेबसाईट च्या लिंक सुद्धा दिल्या आहेत.

images: Taken from Google

Form submission is now closed.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights