Home » iran-Israel War सख्खे मित्र कसे बनले एकमेकांचे पक्के वैरी ?

iran-Israel War सख्खे मित्र कसे बनले एकमेकांचे पक्के वैरी ?

100
0

वाचकांनो तुम्हाला माहित असेलच इरान आणि इस्रायल या दोन देशांमध्ये सुरू अएसलेल्या युद्धाबद्दल. ज्याचे परिणाम केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. पण , तुम्हाला माहित आहे का ? आता एकमेकांचे पक्के वैरी बनलेले हे दोन देश एकेकाळी एकमेकांचे सख्खे मित्र होते. मग हे सख्खे मित्र एकमेकांचे पक्के वैरी कसे काय बनले? चला तर मग जाणून घेऊया यांचा इतिहास.

एकमेकांचे सख्खे मित्र (1948-1979 )

इस्रायल ची स्थापना 1948 मध्ये झाली. तेव्हा मुस्लिम राष्ट्र असूनही इराणने इस्रायलला कोणताही विरोध केला नाही त्याकाळात इराणमध्ये राजेशाही होती . शाह मोहम्मद रझा पल्लवी यांच्या नेतृत्वाखाली इराणने इस्रायल शी घनिष्ठ संबंध ठेवले होते .दोन्ही देशांमध्ये व्यापारी, लष्करी आणि गुप्तचर सहकार्य होते . इराण इस्रायलला तेलपुरवठा करत होते तर इस्रायल कडून इराणला कृषी आणि संरक्षण क्षेत्रात तांत्रिक मदत दिली जात होती.

दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये बिघाड (1979 )

अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली . शाह सत्तेचा अंत झाला. त्या नंतर अयातुल्ला खोमेनी यांनी इस्लामिक कायदे लागू केले . त्यावेळी इराणने इस्रायलला ‘अवैध राष्ट्र ‘ घोषित करत त्याला विरोध केला.

खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणने इस्रायल शी सर्व प्रकारचे राजनैतिक, आर्थिक आणि लष्करी संबंध सुध्दा तोडले. इराणने ‘ पॅलेस्टिनी मुक्तीचा ‘ एजेंडा स्वीकारत इस्रायलला नष्ट करण्याचे खुले धोरण जाहीर केले. इस्रायल विरोधात लढणाऱ्या हिज्बुल्ला ( लेबनाॅन) आणि हमास ( गाझा) सारख्या दहशतवादी संघटनांना इराणने मदत सुरू केली.

युद्धाची छाया ( 2000-2020 )

इराणने एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला अणु कार्यक्रम सुरू केला .हा अणु कार्यक्रम आपल्यासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे इस्रायलने जाहीर केले. अणु कार्यक्रमाचा ऊर्जेसाठी वापर न करता इराण अण्वस्त्र निर्माण करण्याच्या मार्गाावर आहे असा आरोप इस्रायलने केला .

इराणने हे आरोप फेटाळून लावले. पण इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून इराणच्या या अणु ऊर्जा कार्यक्रमावर अनेक वेळा सायबर हल्ले करण्यात आले . इस्रायलने 2008 पासून इराणच्या अणु शास्त्रज्ञांची टार्गेटेड किलिंग सुरू केली.

संघर्षाच्या दिशेने वाटचाल ( 2020 नंतरचा काळ )

या पुर्वी इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेला अप्रत्यक्ष संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला

2020 : इस्रायलने इराणचे प्रमुख अणु शास्त्रज्ञ मोहसेन फखरीजादे यांची हत्या केली .

2021-2022 : सिरिया , इराक आणि लेबनाॅन मधील इराण समर्थित गटांमध्ये इस्रायलने वारंवार हवाई हल्ले केले.

2023-2024 : इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने थेट हस्तक्षेपाचा इशारा दिला.

एप्रिल 2024 : इराणने इस्रायल वर थेट ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला . हा हल्ला या दोन देशांतील तणावाचे एक ऐतिहासिक वळण मानले जाते.

वादाचे कारण –

  1. प्रादेशिक प्रभाव : इराण आपला प्रभाव सिरिया, लेबनाॅन, इराक आणि यमन मध्ये वाढवत आहे. तो इस्रायलला धोका वाटतो .
  2. अण्वस्त्र धोरण : इस्रायलच्या मते , इराणकडे अण्वस्त्र असणे म्हणजे इस्रायलच्या अस्तित्वाला धोका आहे .
  3. धर्म आणि राजकारण : शिया-इस्लामी इराण आणि ज्यू इस्रायल यांच्यात मूलतः टोकाचे मतभेद आहेत. तोच वाद आता इस्रायल आणि इराण मध्ये पुढे सुरू आहे.

प्रत्यक्षात युद्ध सुरू

आतापर्यंत या दोन देशांमध्ये छुपे शत्रुत्व सुरू होते . पण या वादाने आता प्रत्यक्ष युद्धाचे स्वरूप घेतले आहे . इस्रायलने तेहराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणनेही त्याला जशास तस प्रत्युत्तर देत इस्रायलच्या तेल अविव शहरावर हल्ला केला. त्यामध्ये मोजायचे मुख्यालय ही लक्ष्य केले .

आज या संघर्षाचा परिणाम संपूर्ण मध्य पुर्वेवरच नव्हे तर जागतिक राजकारणावर होत आहे.

तर अशा प्रकारे हे दोन सख्खे मित्र एकमेकांचे पक्के वैरी बनले.

Form submission is now closed.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights