
28 जानेवारी 2026 या दिवसाची सकाळ आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी एक न पचणारा धक्का आणि विश्वास न बसावा अशी बातमी घेऊन आली, विमान अपघातात अजित पवार यांचे निधन. ऐकून मन अगदी सुन्न झाले. अजित पवार यांच्यासोबत अजुन चार जणांचा देखील मृत्यू झाला. सगळेच अगदी कमी वयाचे होते. मनाला चटका लावून जाणारी अशी ही बातमी होती. कधीही भरून निघणार नाही, अशी पोकळी निर्माण झालीये या महाराष्ट्राच्या राजकारणात, अजित पवार यांच्या जाण्याने. कारण, अजित पवार पुन्हा होणे नाही.
महाराष्ट्रात आजवर किती नेते होऊन गेलेत. यशवंतराव चव्हाण असो, विलासराव देशमुख असोत की बाळासाहेब ठाकरे असोत. त्यांची जागा आजवर कुणी घेऊ शकले का ? नाही ना. त्यांच्यासारखे तेच. मग अजित पवार यांची तरी रिप्लेसमेंट तरी कशी काय शक्य आहे ? नाहीच ते शक्य. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. प्रत्येकाचे गुण वेगवेगळे असतात. जरी अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी अजित पवार यांच्या सारख काम करण त्यांना जमणार आहे का ? त्या त्यांची स्वतः ची वेगळी जागा निर्माण करतील ना. कारण अजित पवार पुन्हा होणे नाही.
अजित पवार यांच्यासारखा स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा, मनमोकळेपणाने बोलण,लोकांना जपण हे इतर कुणाला जमणार आहे का ? अजित पवार यांच्यासारखे गरिबांच्या गरिबीची जाण असणारे, लोकांना तत्काळ मदत करणारे नेते या महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा भेटणार आहेत का ? नाही ना. कारण, अजित पवार पुन्हा होणे नाही.
अजित पवार यांनी जाती-पातीच राजकारण नाहीच केल कधी. अजित पवार यांनी कधीही आपल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर नाही सोडल. अजित पवार जे आहे ते रोखठोक आणि स्पष्ट बोलायचे. अजित पवार हे कधीही कुणाला त्यांच्या पाया पडू द्यायचे नाहीत. ते स्पष्टपणे म्हणायचे, ” आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत “. असे खर, स्पष्ट आणि रोखठोक बोलणारे नेते या महाराष्ट्राला पुन्हा भेटणार आहेत का ? नाही ना. कारण, अजित पवार पुन्हा होणे नाही.
किती आले, अन किती गेले...
त्यांच्यासारखे न कुणी होऊ शकले...
त्यांच्यासारखे तेच....
