Arattai App – भारताचे स्वदेशी Whatsapp

30
0

वाचकहो…पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी आपल्या भाषणात भारतीय जनतेला सांगत असतात की , स्वदेशी वस्तूंचा वापर करा, आत्मनिर्भर बना. जर आपण वस्तू, उत्पादने हे स्वदेशी म्हणजेच आपल्या भारत देशात तयार झालेले वापरू शकतो, तर मग आपल्या मोबाईल मधले Apps देखील आपण स्वदेशीच वापरायला हवेत ना. तर मग याच पार्श्वभूमीवर भारताने Whatsapp ला पर्याय म्हणून आणि Whatsapp ला टक्कर देण्यासाठी स्वतःचे स्वदेशी App तयार केले आहे. ते App आहे Arattai . चला तर मग या App बद्दल जाणून घेऊयात.

‘Arattai ‘ हा तमिळ शब्द आहे. ज्याचा अर्थ ‘ गप्पा ‘ असा होतो. Arattai हे App जानेवारी 2021 मध्ये Zoho Corporation या कंपनीने लाँच केले आहे. श्रीधर वेंबू यांनी Zoho Corporation ची स्थापना 1996 मध्ये केली होती. सुरूवातीला या कंपनीचे नाव AdventNet असे होते. नंतर 2009 मध्ये या कंपनीचे नाव बदलुन Zoho Corporation असे करण्यात आले. Zoho Corporation या कंपनीचे मुख्यालय तमिळनाडू मध्ये चेन्नई येथे आहे.

जसे की मी सुरूवातीलाच तुम्हाला सांगितले की Arattai हे App Whatsapp चा पर्याय म्हणून आणि Whatsapp ला टक्कर देण्यासाठी भारताने बनवलेले आहे. Arattai हे App अगदी Whatsapp सारखेच आहे. वापरण्यास अगदी सहज, सोपे आणि सुलभ असे हे App आहे.

आता पाहुयात Arattai या App ची वैशिष्ट्ये काय आहेत ते

  1. Arattai या App च सगळ्यात मोठे वैशिष्ट्य हे आहे की हे App भारतीय आहे, स्वदेशी आहे.
  2. Arattai या App वर तुम्ही मेसेजेस पाठवू शकतात, इमेजेस , व्हिडिओ आणि पीडीएफ फाईल देखील तुम्ही शेअर करू शकता.
  3. Arattai या App वर तुम्ही व्हाॅइस काॅल, व्हिडिओ काॅल आणि Conference काॅल देखील करू शकतात .
  4. Whatsapp प्रमाणेच Arattai हे App देखील मोफत आहे.
  5. Whatsapp प्रमाणेच Arattai या App वर देखील End to End Encryption ची सुविधा देण्यात आली आहे.
  6. Whatsapp प्रमाणेच Arattai या App वर देखील Status ठेवू शकतात.
  7. Arattai हे App तुम्ही मोबाईल आणि डेस्कटॉप कम्प्युटर वर देखील वापरू शकतात.

Zoho Corporation या कंपनीने Arattai या App सोबतच अजुन इतरही अनेक Apps लाँच केले आहेत.

  1. Zoho Mail
  2. Zoho Calender
  3. Zoho One
  4. Zoho show
  5. Zoho Workspace
  6. Zoho Notebook
  7. Zoho Document Scanner
  8. Zoho Fill and E sign Document
  9. Ulaa Browser

इत्यादी.

मग आहे की नाही Whatsapp पेक्षा भारी आपले स्वदेशी Arattai App .

चला तर मग तुम्हीही तुमच्या मोबाईल मध्ये Arattai App Install करा.

मी तर install केलय कधीच. आता तुम्हीही Install करा Arattai App .

Image – Taken from Google.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights