Home » स्पर्धा परीक्षा आणि मानसिक ताण

स्पर्धा परीक्षा आणि मानसिक ताण

2
0

भारतातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा हा करिअर घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. UPSC , MPSC , बँकिंग, रेल्वे , SSC अशा विविध परीक्षांमधून लाखो विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी प्रयत्न करत असतात. या परीक्षा फक्त ज्ञान आणि अभ्यासकौशल्याचीच कसोटी नसून, त्या उमेदवारांच्या मानसिक स्थैर्याची , संयमाची ,आणि आत्मविश्वासाचीही परीक्षा घेतात. त्यामुळेच मानसिक ताण (Stress) हा घटक या प्रवासात टाळता येत नाही. परंतु त्याचा योग्य प्रकारे सामना करणे हेच यशाचे मुख्य गुपित आहे .

स्पर्धा परीक्षेत मानसिक ताण का येतो ?

  1. जोरदार स्पर्धा – लाखो-करोडो विद्यार्थी आणि मर्यादित जागा यामुळे नैसर्गिक दबाव निर्माण होतो.
  2. अधिक अपेक्षा – कुटूंबीय, समाज आणि नातेवाईक यांच्या अपेक्षा यामुळे उमेदवारांवर मानसिक ताण वाढतो.
  3. अविरत अभ्यास – रोजचा तासनतास अभ्यास, पुनरावृत्ती आणि परीक्षेतील वेळेचे बंधन मानसिक ताण वाढवते.
  4. अपयशाची भीती – पुर्वीच्या प्रयत्नात अपयश आले असेल तर पुढच्या वेळी ‘ काय होईल ?’ या विचाराने उमेदवार त्रस्त होतो.
  5. सामाजिक तुलना – इतर मित्रांचा यशस्वी प्रवास पाहून स्वतःची तुलना केल्यामुळे अस्वस्थता निर्माण होते.

मानसिक ताणाचे दुष्परिणाम

  • एकाग्रतेचा अभाव.
  • स्मरणशक्ती कमी होणे.
  • निद्रानाश , चिडचिडेपणा.
  • आरोग्याचे प्रश्न जसे की डोकेदुखी, थकवा, पचनाचे त्रास.
  • आत्मविश्वास घटणे आणि अपयशाची भीती वाढणे.

मानसिक ताणामुळे हे असे अनेक दुष्परिणाम उदभवतात.

मानसिक ताण कमी करण्याचे उपाय

  1. योग्य नियोजन – अभ्यासाचे तास, पुनरावृत्ती व विश्रांती यांचा संतुलित आराखडा तयार करावा.
  2. छंद जोपासणे – वाचन, संगीत, खेळ, चित्रकला, लेखन यांसारख्या छंदांमुळे मनाला ताजेपणा मिळतो.
  3. शारीरिक व्यायाम आणि योगा – नियमित व्यायाम, प्राणायाम , ध्यान यामुळे मानसिक ताण नियंत्रित होतो.
  4. सकारात्मक विचारसरणी – ‘ मी करू शकतो/मी करू शकते ‘ हा आत्मविश्वास टिकवणे महत्त्वाचे . अपयश हि यशाकडे नेणारी पायरी आहे , हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
  5. रसमुपदेशन आणि संवाद – आपल्या भावना कुटुंबियांशी , मित्रमैत्रिणींशी किंवा गुरूंशी शेअर केल्यास मानसिक ओझे हलके होते.
  6. आरोग्यदायी आहार व झोप – पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप मानसिक तसेच शारीरिक शक्ती वाढवते.

निष्कर्ष

स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ ज्ञानाचा प्रवास नसून ती मानसिक स्थैर्याचीही कसोटी आहे. मानसिक ताण हा पुर्णपणे टाळता येत नाही, पण तो सकारात्मक ऊर्जेत बदलणे शक्य आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, आत्मविश्वास आणि संयम या त्रिसूत्रीच्या मदतीने कोणतीही स्पर्धा परीक्षा जिंकता येते.

खरी स्पर्धा ही इतरांशी नसून स्वतःच्या भीतीशी आणि मानसिक ताणाशी असते. जो उमेदवार हे पेलतो, तोच यशाच्या शिखरावर पोहोचतो.

Image – Taken from Google

Subscription Form (#4)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights