
महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालू आहे, ते पाहून सामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न ऊभा राहतो – शेतकरी , बळीराजा, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा घटक , त्याचे प्रश्न नेमके कोण सोडवणार?
Table of contents
सध्या राज्यात काय चालू आहे?
एकीकडे ” कबुतरांचा मुद्दा ” , तर दुसरीकडे ” हत्ती चा विषय ” आणि धार्मिक-राजकीय स्तरावर ” वराह जयंती ” सारखे विषय सतत चर्चेत आहेत. हे प्रश्न देखील महत्वाचे आहेत , परंतु सामान्य माणसाच्या विशेषतः शेतकऱ्याचे प्रश्न मात्र यामुळे मागे पडतात.
बळीराजाचे खरे प्रश्न
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत आजही पाणीटंचाई , वीजपुरवठा, सिंचनाची अभावग्रस्त व्यवस्था, पीकविमा, बाजारभावाचा असमतोल असे अनेक मुद्दे आहेत.
- पावसावर अवलंबून असलेले शेतीचे उत्पन्न.
- वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी.
- कृषीमालाला मिळणारे कमी दर.
- शेतमाल साठवणुकीची अपुरी साधने.
- जास्त पाऊस पडल्यावर पीक पाण्यात वाहुन जातात.
या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी आत्महत्या करतोय, कर्जबाजारी होतोय आणि त्याच्या आयुष्याची लढाई अजुनच कठीण होत चालली आहे.
राजकीय चर्चेचा सुर
राजकीय नेत्यांच्या चर्चेतून शेतकऱ्यांचा प्रश्न गौण बनला आहे. सभागृहात देखील चर्चा होते ती कबुतरांच्या प्रश्नांवर, हत्तीच्या मुद्द्यावर किंवा धार्मििक कार्यक्रमांच्या राजकारणावर. निश्चितच या प्रश्नांनाही महत्त्व आहे , पण राज्याच्या भविष्यासाठी बळीराजा जगला पाहिजे, ऊभा राहिला पाहिजे . आणि त्यासाठी त्याच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यायला हवे ना.
उपाययोजना कोणत्या?
- पाणी व्यवस्थापन – शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन सिंचन प्रकल्प आणि शाश्वत जलव्यवस्था ही प्राथमिक गरज आहे.
- कृषी उत्पादनाला बाजारभाव – शेतमालाला योग्य बाजारभाव आणि हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कमी होईल.
- तंत्रज्ञानाचा वापर – स्मार्ट शेती , डिजिटल मंडई, आधुनिक सिंचन तंत्रज्ञान याचा प्रसार करणे आवश्यक आहे.
- कर्जमुक्ती धोरण – फक्त कर्जमाफी नको , तर शेतकऱ्याला कर्ज न घेता टिकून राहता येईल अशी आर्थिक व्यवस्था ऊभी करणे.
- पीकविमा अंमलबजावणी – प्रत्यक्षात शेतकऱ्याला योग्य भरपाई मिळेल याची खात्री.
निष्कर्ष
महाराष्ट्राचा शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कबुतर, हत्ती आणि वराह जयंती या प्रश्नांना राजकीय रंग दिला गेला तरी , खऱ्या अर्थाने महाराष्ट्र वाचवायचा असेल, ग्रामीण भाग बळकट करायचा असेल, तर बळीराजाला केंद्रबिंदू मानून धोरणे आखावी लागतील.
राजकारणातील गोंधळ आणि बाह्य मुद्द्यांच्या चर्चेपलीकडे जाऊन, जर खरोखरच महाराष्ट्राच्या जमिनीवर ऊभा असलेला शेतकरी सुखावला, तरच राज्याच्या प्रगतीची खरी वाट मोकळी होईल आणि त्यासोबतच भारताचीही प्रगती होईल.
image – Taken from google .
Very useful information.
Very knowledgeable information .
Very nice information.
Important information.