संकट ही शिकवून जातात.

लाईक करा 4
डिसलाईक करा 0

आपल्या आयुष्याचा प्रवास हा कधीच सहज, सरळ आणि सोपा नसतो. कधी सुखाची सावली असते, तर कधी दुःख ही वाट्याला येते. पण, जेव्हा आपल्या आयुष्यात एखाद दुःख किंवा संकट येते, तेव्हा आपण खचून जातो, कोलमडून पडतो. जेव्हा आपल्यावर संकट येते, तेव्हा आपण नेहमीच प्रश्न विचारतो की, हि सर्व संकट माझ्याच वाट्याला का येतात? मीच का ? या संकटांना माझाच पत्ता का सापडतो? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. पण, हि संकटे काही आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत, तर हि संकटे आपल्यला काहीतरी नवीन शिकवून जातात.

अनेकदा ना आपण स्वतःला एका चौकटीत, एका विशिष्ट अशा कम्फर्ट झोन मध्ये बांधून ठेवतो की, हि गोष्ट मला जमनारच नाही, मला येणारच नाही. पण, जेव्हा आपल्यावर संकट येते ना, तेव्हा आपण स्वतःहून स्वतःला त्या चौकटीतून, त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढतो आणि नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो.

संकटे हि आपल्याला सहनशील बनवतात. संकटे हि आपल्याला संयम ठेवायला शिकवतात. जेव्हा आपलयावर संकट येते ना, तेव्हा खचून न जाता, थोड थांबून, विचार करून त्यावर तोडगा काढायचा असतो.

आपल्या आयुष्यात येणारी संकटे हि आपल्याला ओळख करून देतात आपल्यातील परक्यांची आणि परक्यातील आपल्या लोकांची. जे खरोखर आपले असतात ना, ते संकटात आपली साथ कधीच सोडत नाहीत, ते नेहमीच सावलीसारख आपल्या सोबत असतात. आणि जे लोक आपल्यावर संकट आले की आपली साथ सोडतात ना, समजायचं की ते कधी आपले नव्हतेच.

संकटे हि आपल्याला नवीन मार्ग शोधायला शिकवतात. सध्या इरान-इस्रायल- अमेरीकेच युद्ध सुरू आहे. भारतावरच नाही, तर पूर्ण जगावर तेल आणि गॅसचे संकट कोसळलय. गॅस मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडली , अनेक रिक्शा देखील बंद आहेत. पण, संकटातही लोक मार्ग शोधत आहेत. कुणी चुलीचा मार्ग निवडलाय, तर कुणी Induction चा मार्ग निवडलाय . सोशल मीडियावर देखील बायोगॅस, सोलर असे एक ना अनेक पर्याय व्हायरल होताय. मला सांगा पहिले आपल्याला हे सर्व पर्याय माहित होते का? ना ही ना . आणि माहित असले तरी आपण त्यांचा वापर करत होतो क? नाही. या युद्धामुळे उद्भवलेल्या तेल आणि गॅस च्या संकटामुळेच आपण हे सर्व पर्याय शोधले आणि त्यांचा वापर देखील करतोय.

तर हे सर्व सांगण्यामागे माझा उद्देश आणि उपदेश हाच आहे की, संकटे हि आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवून जातात. आपण येणाऱ्या प्रत्येक संकटापासून धडा घ्यायचा असतो आणि पुढे जायचे असते.

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे.

“Problems are Part of Life ,

Facing them is Art of Life.”

लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका. वाचत रहा Ideal Marathi .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

//omg10.com/4/10825355
Scroll to Top
Verified by MonsterInsights