Home » लवकरात लवकर ई- केवायसी करा, नाहीतर रेशन आणि रेशन कार्ड होणार बंद.

लवकरात लवकर ई- केवायसी करा, नाहीतर रेशन आणि रेशन कार्ड होणार बंद.

14
0

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत गरीब गरजू लोकांना मोफत रेशन धान्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेत असलेल्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातली आहे. योजनेमधील बनावट लाभ घेणारे यातून समोर येतील.

हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून ‘ ई-केवायसी ‘ न केलेल्यांचे रेशन धान्य 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे .

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत मोफत धान्य मिळविण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ‘ ई-केवायसी ‘ चे बंधन घालण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिलेले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक शिधापत्रिका धारकांनी ‘ ई-केवायसी ‘ ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे.

तत्पूर्वी, ‘ ई-केवायसी ‘ करण्यासाठी 31 ऑक्टोंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर शिधा पत्रिका धारकाने 31 ऑक्टोंबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही. या शिवाय अशा शिधा पत्रिका धारकांची नावेही रेशन कार्ड मधून वगळली जाणार असून त्या शिधा पत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. रेशन कार्ड वर मोफत रेशन या योजने साठी अपात्र असतांनाही अनेकजण मोफत रेशन धान्य घेतात.

या शिवाय अनेक लोक सध्या या जगात नाहीत, ज्यांचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्यापही त्यांची नावे शिधा पत्रिकां मध्ये च आहेत . दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधा पत्रिका धारक म्हणजेच कुटूंबाच्या शिधा पत्रिकेत ज्यांची ज्यांची नावे नोंदवलेली आहेत, त्या सर्वांना ‘ ई-केवायसी ‘ करावीच लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
×
Verified by MonsterInsights