Home » मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना दिवाळीची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना दिवाळीची भेट

15
0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मुंबईत प्रवेश करणार्‍या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या ननार्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा मोठा निर्णय मानला जात आहे.

वाशी, मुलुंड पुर्व-पश्चिम, ऐरोली दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरुन जातांना लहान वाहनांवर टोलचा भार होता . परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या टोलनाक्यांवरुन टोल घेतला जाणार नाही.

या वर्षाच्या सुरूवातीला, या टोल नाक्यांवर लहान वाहनांचा टोल 45 रूपये करण्यात आला होता. दर तीन वर्षांनी टोल वाढीच्या नियमांनुसार ही वाढ करण्यात आली होती.सन 2000 पासून , मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत . शहरातील उड्डाणपुलां च्या बांधकामाशी संबंधित खर्च भरून काढण्या साठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता.

मंत्रिमंडळ निर्णय:

  1. मुंबईतल्या 5 प्रवेश मार्गावरील पथकर (टोल ) लहान वाहनांसाठी माफ, आज रात्री 12 वाजेपासून अंमलबजावणी.
  2. आगरी समाजासाठी महामंडळ.
  3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना Career Advancement Scheme.
  4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता.
  5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता.
  6. वैजापूर च्या शनिदेवगाव बंधारा यास प्रशासकीय मान्यता.
  7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसी ला हस्तांतरित.
  8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवना साठी.
  9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठा साठी विनामूल्य.
  10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ( शहरी ) 2.o राबविणार.
  11. पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिका यांच्या कामास मान्यता.
  12. किल्लारी च्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ.
  13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ.
  14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिन ची 3 पदे.
  15. खंड क्षमापीत झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना.
  16. मराठी भाषेविषयक जनजागृती साठी पंधरवडा.
  17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट.
  18. ‘उमेद’ साठी अभ्यासगट.
  19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
×
Verified by MonsterInsights