Home » महाराष्ट्र

महाराष्ट्र

21
0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना दिवाळीची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मुंबईत प्रवेश करणार्‍या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या ननार्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा मोठा निर्णय मानला जात आहे.

वाशी, मुलुंड पुर्व-पश्चिम, ऐरोली दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरुन जातांना लहान वाहनांवर टोलचा भार होता . परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या टोलनाक्यांवरुन टोल घेतला जाणार नाही.

या वर्षाच्या सुरूवातीला, या टोल नाक्यांवर लहान वाहनांचा टोल 45 रूपये करण्यात आला होता. दर तीन वर्षांनी टोल वाढीच्या नियमांनुसार ही वाढ करण्यात आली होती.सन 2000 पासून , मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत . शहरातील उड्डाणपुलां च्या बांधकामाशी संबंधित खर्च भरून काढण्या साठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता.

मंत्रिमंडळ निर्णय:

  1. मुंबईतल्या 5 प्रवेश मार्गावरील पथकर (टोल ) लहान वाहनांसाठी माफ, आज रात्री 12 वाजेपासून अंमलबजावणी.
  2. आगरी समाजासाठी महामंडळ.
  3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना Career Advancement Scheme.
  4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता.
  5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता.
  6. वैजापूर च्या शनिदेवगाव बंधारा यास प्रशासकीय मान्यता.
  7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसी ला हस्तांतरित.
  8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवना साठी.
  9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठा साठी विनामूल्य.
  10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ( शहरी ) 2.o राबविणार.
  11. पुणे मेट्रो रेल टप्पा-2 मधील रेल्वे मार्गिका यांच्या कामास मान्यता.
  12. किल्लारी च्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ.
  13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ.
  14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिन ची 3 पदे.
  15. खंड क्षमापीत झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना.
  16. मराठी भाषेविषयक जनजागृती साठी पंधरवडा.
  17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट.
  18. ‘उमेद’ साठी अभ्यासगट.
  19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव .

October 16, 2024

2:13 pm

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘ महिला समृद्धी योजना ‘

63 0 भारतामध्ये महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे केंद्र व राज्य सरकारांच्या…

डिजिटल शेती – भारतीय शेतकऱ्यांसाठी एक क्रांती

74 0 भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील जवळपास 55% लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून…

पंढरपुरचा विठोबा – श्रद्धेचा महासागर

120 0 महाराष्ट्राच्या सोलापुर जिल्ह्यातील पंढरपुर हे शहर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे , धार्मििक आणि…

2025 मध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा वेग वाढतोय – काय आहे यामागच रहस्य ?

85 0 2025 हे वर्ष भारतासाठी डिजिटल क्षेत्रात क्रांतिकारक ठरते आहे . मोबाईल इंटरनेटचा वेग , UPI…

हिंदी भाषा आणि महाराष्ट्रातील राजकारण : एक सविस्तर अभ्यास.

106 0 वाचकांनो तुम्हाला माहितच असेल की , इयत्ता 1ली ते 5 वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा…

iran-Israel War सख्खे मित्र कसे बनले एकमेकांचे पक्के वैरी ?

100 0 वाचकांनो तुम्हाला माहित असेलच इरान आणि इस्रायल या दोन देशांमध्ये सुरू अएसलेल्या युद्धाबद्दल…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ” अच्छे दिन “.

101 0 वाचकांनो तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत…

पॅरिस मधील आयफेल टाॅवर पेक्षाही ऊंच असा पुल आपल्या भारतात आहे. जाणून घ्या कुठे आहे हा पुल ?

29 0 वाचकांनो तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात ऊंच रेल्वे पुल , अगदी पॅरिस मधील आयफेल टाॅवर…

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान.

20 0 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी 27 मे , 2025 रोजी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात…
Scroll to Top
×
Verified by MonsterInsights