Home » भारतीय चित्रपट सृष्टीतील “भारत” काळाच्या पडद्याआड.

भारतीय चित्रपट सृष्टीतील “भारत” काळाच्या पडद्याआड.

8
0

मनोज कुमार हे हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते. मनोज कुमार यांचे आज 4 एप्रिल, 2025 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रूग्णाालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला . गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनोज कुमार आजारी होते. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, आज मनोज कुमार यांची प्राणज्योत विझली.

9 ऑक्टोंबर, 1956 साली हिरो बनण्याच स्वप्न उराशी घेऊन वयाच्या 19 व्या वर्षी मनोज कुमार यांनी दिल्लीहून मुंबई गाठली. 1957 मध्ये पहिल्या चित्रपटात 19 वर्षाच्या मनोज कुमार यांनी 80-90 वर्षाच्या भिकारीची छोटीशी भूमिका केली . हरिकिशन गोस्वामी हे मनोज कुमार यांच नाव होत, जे नंतर बदलल गेल.

मनोज कुमार यांना का पडले ‘ भारत कुमार ‘ हे नाव?

मनोज कुमार यांचे चित्रपट देशभक्तीने प्रेरीत असायचे. त्यांचे क्रांती, उपकार, पूरब और पश्चिम हे चित्रपट व त्या चित्रपटांमधील गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. ‘ मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे-मोती ‘ , ‘ भारत का रहने वाला हू , भारत की बात सुनाता हू ‘ . मनोज कुमार यांच्या या देशभक्तीने प्रेरित चित्रपटांमुळे व मनोज कुमार यांच्या चित्रपटांमधील योगदानामुळे त्यांना ‘ भारत कुमार ‘ हे नाव मिळाले व त्यांनी ते स्वीकारले देखील. क्रांती या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्या सोबत काम केल. या चित्रपटात हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, परवीन बाबी, सारिका, प्रेम चोपडा हे सर्व कलाकार देखील होते. हा चित्रपटही त्यातल्या गाण्यांमुळे सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाच दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केल होत. तर त्यात मुख्य भूमिकाही साकारली होती.

चार दशकांची प्रदीर्घ कारकीर्द

मनोज कुमार यांनी फॅशन या चित्रपटातून 1957 मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तिथपासून पुढची 38 वर्षे म्हणजे जवळपास चार दशक ते काम करत होते. 1995 मध्ये आलेला मैदान ए जंग हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले नाही. शोर, क्रांती, क्लर्क, रोटी कपडा और मकान, जय हिंद, उपकार या चित्रपटांमध्ये त्यांनी दिग्दर्शकाची आणि संकलकाची भूमिकाही पार पाडली.

चित्रपट :

मनोज कुमार यांनी अभिनय केलेले चित्रपट :

  1. 1957 – फॅशन
  2. 1958 – सहारा
  3. 1958 – पंचायत
  4. 1960 – हनीमून
  5. 1961 – रेशमी रूमाल
  6. 1961 – काँच की गुडिया
  7. 1961 – सुहाग सिंदूर
  8. 1962 – शादी
  9. 1962 – नकली नवाब
  10. 1962 – डॉक्टर विद्या
  11. 1962 – बनारसी ठग
  12. 1962 – अपना बना के देखो
  13. 1962 – माँ बेटा
  14. 1962 – हरियाली और रास्ता
  15. 1963 – गृहस्थी
  16. 1963 – घर बसा के देखो
  17. 1964 – फूलों की सेज
  18. 1964 – अपने हुए पराये
  19. 1964 – वो कौन थी
  20. 1965 – गुमनाम
  21. 1965 – बेदाग
  22. 1965 – शहीद
  23. 1965 – पूनम की रात
  24. 1965 – हिमालय की गोद में
  25. 1966 – सावन की घटा
  26. 1966 – पिकनिक
  27. 1966 – दो बदन
  28. 1967 – पत्थर के सनम
  29. 1967 – उपकार
  30. 1967 – अनीता
  31. 1968 – आदमी
  32. 1968 – नीलकमल
  33. 1969 – साजन
  34. 1970 – पहचान
  35. 1970 – यादगार
  36. 1970 – पूरब और पश्चिम
  37. 1970 – मेरा नाम जोकर
  38. 1972 – शोर
  39. 1972 – बेईमान
  40. 1974 – रोटी कपडा और मकान
  41. 1975 – संन्यासी
  42. 1976 – दस नम्बरी
  43. 1977 – अमानत
  44. 1977 – शिरडी के साई बाबा
  45. 1979 – जाट पंजाबी
  46. 1981 – क्रांति
  47. 1987 – कलयुग और रामायण
  48. 1989 – संतोष
  49. 1989 – देशवासी
  50. 1989 – क्लर्क
  51. 1995 – मैदान ए जंग

पटकथा लेखक :

  1. 1967 – उपकार
  2. 1970 – यादगार
  3. 1970 – पूरब और पश्चिम
  4. 1970 – मेरा नाम जोकर
  5. 1972 – शोर
  6. 1974 – रोटी कपडा और मकान
  7. 1981 – क्रांति
  8. 1987 – कलयुग और रामायण
  9. 1989 – क्लर्क
  10. 1999 – जय हिंद

निर्माता :

  1. 1970 – पूरब और पश्चिम
  2. 1972 – शोर
  3. 1974 – रोटी कपडा और मकान
  4. 1981 – क्रांति
  5. 1983 – पेंटर बाबू
  6. 1989 – क्लर्क
  7. 1999 – जय हिंद

निर्दशक:

  1. 1967 – उपकार
  2. 1970 – पूरब और पश्चिम
  3. 1972 – शोर
  4. 1974 – रोटी कपडा और मकान
  5. 1981 – क्रांति
  6. 1989 – क्लर्क
  7. 1999 – जय हिंद

पुरस्कार :

मनोज कुमार यांना आजवरच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

फिल्मफेअर पुरस्कार :

  1. 1968 – सर्वोत्कृष्ट चित्रपट – उपकार
  2. 1968 – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – उपकार
  3. 1968 – सर्वोत्कृष्ट कथा – उपकार
  4. 1968 – सर्वोत्कृष्ट संवाद – उपकार
  5. 1969 – सर्वोत्कृष्ट अभिनेता – बेईमान
  6. 1972 – सर्वोत्तम संपादन – शोर
  7. 1972 – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – रोटी कपडा और मकान
  8. 1992 – पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
  9. 1999 – जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
  10. 2007 – सरदार पटेल जीवनगौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  11. 2008 – स्टार स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार
  12. 2010 – 12 व्या मुंबई चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार
  13. 2012 – अप्सरा फिल्म अँड टेलिव्हीजन प्रोड्यूसर्स गिल्ड पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार
  14. 2012 – नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार
  15. 2012 – न्यू जर्सी युनायटेड स्टेट्स येथे भारत गौरव पुरस्कार
  16. 2013 – जागरण चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार
  17. 2015 – दादासाहेब फाळके पुरस्कार
  18. 2019 – ( बॉलीवूड फिल्म जर्नलिस्ट अवॉर्ड्स) मध्ये पॉवर ब्रँड्सकडून जीवनगौरव पुरस्कार
  19. 2020 – कलैमामणि पुरस्कार

आपल्या चित्रपटांमधून देशभक्तीची गोडी लावणारे ” भारत कुमार ” हे काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

मनोरंजन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
×
Verified by MonsterInsights