Home » पॅरिस मधील आयफेल टाॅवर पेक्षाही ऊंच असा पुल आपल्या भारतात आहे. जाणून घ्या कुठे आहे हा पुल ?

पॅरिस मधील आयफेल टाॅवर पेक्षाही ऊंच असा पुल आपल्या भारतात आहे. जाणून घ्या कुठे आहे हा पुल ?

29
0

वाचकांनो तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात ऊंच रेल्वे पुल , अगदी पॅरिस मधील आयफेल टाॅवर पेक्षाही ऊंच असा रेल्वे पुल आपल्या भारतात आहे. चला तर मग जाणून घेऊयात कुठे आहे हा सर्वात ऊंच रेल्वे पुल ?

जगातील सर्वात ऊंच असा हा रेल्वे पुल हा आपल्या भारताचा “स्वर्ग” ज्याला आपण म्हणतो त्या जम्मू- काश्मीर येथे चिनाब नदीवर हा जगातील सर्वात ऊंच चिनाब रेल्वे आर्च पुल आहे. काल 6 जुन , 2025 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

हा पुल पॅरिस मधील आयफेल टाॅवर पेक्षा 35 मीटर ऊंच आहे. हा पुल चिनाब नदीवर बांधण्यात आलेला असून तो नदीपासून 359 मीटर ऊंचीवर आहे. या पुलाला आर्च पुल असे देखील म्हणतात. या पुलाची लांबी 1315 मीटर आहे. वारे , भुकंप, पाऊस अशा कोणत्याही नैसर्गिक संकटांचा सामना करण्याची क्षमता या पुलामध्ये आहे.

चिनाब नदीवरील या पुलामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. पुलावरून धावणाऱ्या वंदे भारत रेल्वे मधून कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी फक्त 3 तास लागणार आहेत.

चिनाब पुल हा उधमपुर-श्रीनगर-बारामूला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे , जो भारतातील सर्वात महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आहे. या पुलाची मुख्य कमान 467 मीटर लांब आहे आणि 28,000 मॅट्रिक टन स्टील पासून बनलेली आहे. चिनाब पुलाच्या बांधकामात एका अनोख्या केबल क्रेन सिस्टीमचा वापर करण्यात आला , जो भारतीय रेल्वे मध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आला . हा भारतातील पहिला केबल- स्टे रेल्वे पुल आहे.

या पुलामुळे काश्मीर रेल्वे मार्गाने देशाच्या इतर भागांशी जोडले जाईल . औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल , तसेच पर्यटन देखील वाढेल.

चिनाब येथे भुकंपप्रवण क्षेत्राबाबत अनेक आव्हाने होती . याला तोंड देण्यासाठी एक मोठा पाया बांधण्यात आला . त्याचा आकार फुटबाॅल मैदानाच्या एक तृतीयांश इतका होता . त्याला S-20 असे नाव देण्यात आले. हा संपूर्ण परिसर हिमालयीन प्रदेशात येतो. त्यामुळे येथील जमीन खडकाळ असून कनेक्टिव्हिटी हे सर्वात मोठ आव्हान होत. चिनाब नदीच्या खोऱ्याच्या दोन्ही बाजूला तात्पुरत्या कार्यशाळा आणि प्रिंटर्स उघडण्यात आली होती . डोंगराळ भाग असल्याने विजेचीही खूप मोठी समस्या होती. त्यामुळे सर्वात प्रथम वीज आणण्याची व्यवस्था करण्यात आली . दूरच्या भागातून पाईपद्वारे पाणी आणण्यात आले . चिनाब नदीच्या प्रवाहात अडथळा न आणता पुल बांधावा लागला . सर्वात महत्वाचे म्हणजे, रस्त्याच्या अभावामुळे जड यंत्रसामग्री ची वाहतूक करणे अतिशय कठीण होते. पुलाची ऊंची इतकी जास्त होती , की बांधकामाच काम करण हे खूप मोठ आव्हान होत.पुल बांधतांना, पवन बोगद्याची चाचणी सतत केली जात होती. यासाठी डेन्मार्क च्या फोर्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

अलाइनमेंट रिव्ह्यू चेक काम करण्यासाठी अँबर्ग इंजिनिअरिंग ची नियुक्ती करण्यात आली होती. कोकण रेल्वे काॅर्पोरेशन हा प्रकल्प राबवत होते. 2004 मध्ये पुलाच डिझाईन आणि बांधकाम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, दक्षिण कोरियाची अल्ट्रा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग कंपनी आणि व्हीएसएल इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाला देण्यात आले. फिनलँड स्थित WSP ग्रूप आणि जर्मनी स्थित लिओनार्ड अँड्रीए अँड पार्टनर्स हे या प्रकल्पाचे सल्लागार आहेत. व्हीसीई कन्सल्ट झेडटी-जीएमबीएच ने पुलाच्या खांबांची रचना केली . जोचम अँड्रीयास सेलट्रान्सपोर्ट ने खांबांसाठी केबल्स बसवल्या. पुलाच्या रंगकामांसाठी अक्झो नोबेल कंपनीला कंत्राट देण्याात आले. डिझाईन आणि बांधकाम कामांसाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि देखरेख सेवा प्रदान करण्यासाठी एईसीओएम ला कंत्राट देण्याात आला. त्यांच्या कार्यक्षेत्रात इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट ड्रॉइंग आणि डिझाईन ची प्रूफ-चेकिंग, ग्राऊंड इंजिनिअरिंग, नियोजन आणि सल्लागार यांचा समावेश होता. एस्सार स्टील इंडियाने स्टील पुरवले. स्विस कंपनी मॅगेबा यांनी पुलाच्या बांधकामासाठी गोलाकार स्टाॅपर बेअरिंग्ज पुरविली.

Form submission is now closed.

1 thought on “पॅरिस मधील आयफेल टाॅवर पेक्षाही ऊंच असा पुल आपल्या भारतात आहे. जाणून घ्या कुठे आहे हा पुल ?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights