
महाराष्ट्राच्या सोलापुर जिल्ह्यातील पंढरपुर हे शहर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे , धार्मििक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाचे ठिकाण मानले जाते . येथे स्थित असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विठोबा म्हणजे भक्ती , प्रेम, संयम आणि सत्याची मूर्ती .
Table of contents
विठोबा मंदिराचा इतिहास
या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. लोककथेनुसार भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यात तल्लीन असतांना भगवान विठ्ठल त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देण्यासाठी आले . तेव्हा भक्त पुंडलिक यांनी भगवंताच्या दिशेने एक वीट सरकवली व त्यांना थांबण्यास सांगितले .तेव्हापासून आणि आजही विठूराया हात कटेवर ठेवून आपल्या भक्तांच्या प्रतिक्षेत. हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.
ऐतिहासिक दृष्टिकोनातून , या मंदिराचा उल्लेख इ.स. 12 व्या शतकापासून आढळतो . चालुक्य आणि यादव या राजघराण्यांनी या मंदिराला मोठे महत्व दिले . पुढे मुघल काळात आणि पेशवेकालीन कालखंडात देखील या मंदिराचे पुनरूत्थान व विस्ताार करण्यात आले .
मंदिराची वास्तूशिल्प आणि वैशिष्ट्ये
विठोबा मंदिर हे दगडी बांधकाम असलेले प्राचीन मंदिर असून त्याला अनेक प्रवेशद्वार आहेत. मुख्य गाभाऱ्यात विठोबा आणि रुक्मिणी मातेच्या मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेल्या आहेत.
विशेष म्हणजे , विठोबा आणि रुक्मिणी मातेच्या मूर्ती ऊभ्या असून हात कंबरेवर ठेवलेले आहेत – या मूर्ती भक्त पुंडलिकाच्या प्रतिक्षेत असल्याचे प्रतिक मानल्या जातात .
आषाढी वारी आणि भक्तीचा महापर्व
दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी महाराष्ट्रभरातून पंढरपुरकडे पायी वारी करतात . ही परंपरा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ यांच्यामुळे सुरू झाली.या वारीत भक्ती, एकता , अनुशासन आणि सेवाभावाचे दर्शन घडते.

धार्मिक महत्व
विठोबा मंदिर हे वैष्णव परंपरेतील एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. येथे आलेल्या प्रत्येक भक्ताला ‘ पांडुरंग विठोबा ‘ चे दर्शन मिळाले की आत्मिक समाधान मिळते, असे मानले जाते . मंदिरामध्ये महाद्वार, नामदेव पायरी , भक्त पुंडलिका चे मंदिर , भक्त निवास आणि परिसरातील अनेक छोट्या मंदिरांचे दर्शनही भाविक घेतात.
ऊभा विठोबा चंद्रभागेच्या काठी
ऊभा विठोबा चंद्रभागेच्या काठी,
डोळे मिटता येते तुझे नाव ओठी!!
सावळे रूप, तरी तेजोमय भासे,
भक्तांसाठी रोज विटेवर ऊभा दिसे !!
भक्त पुंडलिकाच्या प्रेमाने झाला स्थिर,
भक्तीच्या शक्तीपुढे झुकला देवधीर!!
टाळ,मृदंग, अभंगांचा गजर,
पंढरपुरच्या गावा सदा गुंजे विठ्ठल नामाचा स्वर!!
रुक्मिणीमाऊली संग ऊभी साजिरी,
पाहता त्यांच्या डोळ्यांत दिसे करुणा पवित्र खरी!!
एकच मागणे दे रे मना शांती,
विठ्ठला सर्वांना लाभू दे सुख आणि समृद्धी!!
निष्कर्ष
पंढरपुरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आधारस्तंभ आहे. येथे फक्त देवाचे दर्शन मिळत नाही, तर आत्मा शांत होतो, जीवनाला दिशा मिळते. वारी असो की रोजची पुजा – प्रत्येक क्षणी येथे भक्तीचा साक्षात्कार होतो.
Very useful information.
Very knowledgeable information .
Very nice information.
Important information.