Home » राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ” अच्छे दिन “.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ” अच्छे दिन “.

101
0

वाचकांनो तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोणता आहे हा निर्णय? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे होईल या निर्णयाचा फायदा ? चला तर मग याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता सेवानिवृत्तीनंतर देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवृत्तीच वय उलटून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून कंत्राटी भरतीनुसार सेवेत घेतले जाईल . असा निर्णय राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतला आहे . त्यामुळे आता 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वयाची सत्तरी गाठेपर्यत सेवेत राहता येणार आहे.

शासकीय आणि निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागांत कंत्राटी पद्धतीने घेण्याावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वयाच्या 65 वर्षापर्यंत आणि त्यानंतरही क्षमता असल्यास वयाच्या सत्तरी पर्यंत काम करता येणार आहे.

गट ‘ अ ‘ आणि गट ‘ ब ‘ संवर्गतील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने काम करता येणार आहे. गट ‘ क ‘ आणि गट ‘ ड ‘ मधील कर्मचाऱ्यांना मात्र सेवानिवृत्तीीनंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाणार नाही. तसेच कोणतीही विभागीय चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यास निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले जाणार नाही.

सरकारी आस्थापनांत अधिकाऱ्यांच्या एकूण पदांच्या 10 टक्के पदांवर निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांना 80 हजारांपर्यंत वेतन देण्याची तरतुद करण्यात आली आहे. म्हणजेच निवृत्तीचे वय 58 असले तरी शरीराने साथ दिल्यास वयाच्या 70 वर्षापर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीला दर महिना 80 हजार नोकरी या माध्यमातून करता येणार आहे.

Form submission is now closed.

केंद्र सरकार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights